चेन्नई । व्हीएसआरएस न्यूज ।
ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना आता तामिळनाडूतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत ओमिक्रॉनचे एकाचवेळी ३३ रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूमध्ये ओमिक्रॉनचा स्फोट झाला आहे. राज्यात Omicron चे ३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे. यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर देशातील ओमिक्रॉनचा वाढता धोका आणि करोनाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत.
एकीकडे तामिळनाडून ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असताना दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील शाळेत करोनाचा स्फोट झाला आहे. एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ९ वी आणि १० वी च्या एकूण २९ विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना सर्दी आणि कफ आहे. त्यांच्या पालकांना याची माहिती दिली गेली आहे. विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्याचं आवाहन पालकांना करण्यात आलं आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्य मौसमी नाग यांनी केलं आहे.
दरम्यान, देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी साडेसहा वाजता ही बैठक घेणार आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
Discussion about this post