व्हीएसआरएस न्युज – नागपूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे यंदा दसरा सणही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे राज्यभरात दसरा राज्य सरकारच्या नियमांचे पालन करुन आणि सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत साजरा केला जाणार आहे.
घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं नागपुरकरांना केला.
आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी, दरवर्षी लाखो लोक दीक्षाभूमीवर येतात. पण यंदा कोरोनानुळे दीक्षाभूमीवरील सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर न येता, घरीच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे यंदा दसरा सणही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे राज्यभरात दसरा राज्य सरकारच्या नियमांचे पालन करुन आणि सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत साजरा केला जाणार आहे.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा बौद्ध अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच, साधेपणाने साजरा करावा.