व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अधिकार या आरटीईची प्रवेश प्रक्रिया 9 तारखेपासुन सुरू होत आहे.
त्याअनुषंगाने या घटकातील विद्यार्थी पालकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रभाग क्र १४ प्रमोद कुटे यांच्यावतीने RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांनी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
तसेच आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्याने कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कुटे त्यांनी केले.