व्हीएसआरएस न्युज निगडी-पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेचे आदेश दिलेत. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाकडून शहरातील अवैध धंद्यावर कारवाई सुरू आहे. या पथकाला निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध्यरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गोपणीय सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार निगडी येथील स्मशानभुमीच्या पाठीमागे अंकुश चौक, पडती चाळ, विटभट्टीजवळ, गौतम शिंदे यांचे पत्र्याचे शेडमध्ये जुगार चालू आहे अशी गुप्त माहिती बातमीदारकडुन मिळाली. त्या माहितीवरुन निगडी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकण्यात आला. या कारवाईत ५६ हजार २६० रुपये रोख रक्कम, १ लाख रुपये किंमतीचे १८ मोबाईल फोन, १६ हजार १०० रुपयांचे रम्मी जुगार
खेळण्याचे साहित्य असा एकुण १ लाख ७२ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी (विजय साहेबराव शेलार, निगडी) व इतर २० इसम यांच्या विरुध्द निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम १८८, २६९, ३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), महा कोवीड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास निगडी पोलीस स्टेशन करीत आहे.
निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने (दि. १८) रोजी छापा टाकून कारवाई केली आहे. या ठिकाणाहून १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी (विजय साहेबराव शेलार, वय २६ वर्षे, रा.रुम नं. ३१४, पंचशिल हो.सोसा., बि.नं. ६. निगडी पुणे व इतर २० इसम यांच्या विरुध्द निगडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) श्री. सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके व त्यांचे पथकातील अंमलदार सहायक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार सुनिल शिरसाठ, नितीन लोंढे, अनंत यादव, पोलीस नाईक भगवंता मुठे, महेश बारकुले, दिपक साबळे, अनिल महाजन, गणेश कारोटे, अमोल शिंदे, नामदेव राठोड, मारुती करचुंडे, पोलीस शिपाई राजेश कोकाटे, मारोतराव जाधव, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगिता जाधव, महिला पोलीस शिपाई सोनाली माने व योगिनी कचरे यांनी केली.