व्हीएसआरएस न्युज -पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत आज पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध ठिकाणी पदवीधर नोंदणीसाठी अभियान राबविले गेले या अभियानाला भाजप अध्यक्ष महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर तुषार हिंगे,नगरसेवक केशव घोळवे, भाजपा सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका योगिता नागरगोजे उपस्थित होते,
नगरसेविका अनुराधा गोरखे व प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी नियोजन केले.
यावेळी बोलताना अमित गोरखे म्हणाले पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही प्रत्येक पदवीधरांची हक्काची निवडणूक असते या निवडणुकीद्वारे पदवीधर मतदार पदवीधर आमदार महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्यासाठी निवडून देत असतात, त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन केले.