व्हीएसआरएस न्युज कोयनानगर एम. टी. डी. सी. चे पुणे विभागातील कोयना धरण क्षेत्राच्या परिसरात असलेले निसर्गरम्य आणि वन्यपशुपक्षांनी किलबिल असलेले, पर्यटक निवास कोयना लेक, कोयनानगर दि. 05/12/2020 रोजी येथे आलेल्या प्रथम पर्यटकांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
निसर्गरम्य परिसर असलेले पर्यटक निवास कोयना लेक मधुन कोयना धरणाचे नयनरम्य दृश्य आणि निसर्गसौंदर्य पाटक निवासाच्या परिसर आणि खोल्यांमधुन डोळयांना सुखावत आहे. पर्यटक निवास कोयना लेक येथे 2 लोकनिवासासह 22 खोल्या (कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स आणि डिलक्स रुम्स) असुन महीला व पुरुषांसाठी स्वतंत्र लोकनिवासाची सोय आहे.
अत्यंत रमणीय अशा या परिसरात उत्कृष्ट आणि रुचकर अशा खाद्य भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्त वाहनतळ आणि मन मोहुन टाकणारे हिरवेगार लॉन ही पर्यटक निवास कोयना लेक ची वैशिष्टये आहेत. महामंडळाने अत्यंत वाजवी दरात सदरच्या खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट यांना बहर आला आहे. महामंडळाने एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवासे ही समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी यादगार करण्यासाठी एम. टी. डी. सी. च्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहेत. महामंडळानेही अशा हौशी पर्यटकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पर्यटक निवासातील व्यवस्थापकांनाच सदर बाबत अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामर्ये खास सवलत देण्यात येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे.
पर्यटक निवास कोयना लेक, कोयनानगर चे अरिफ अत्तार या प्रथम आगमन झालेल्या पर्यटकांच्या शुभ हस्ते करण्यात आले. “कोरोना टाळेबंदीच्या कालावधीतील तणाव कमी करण्यासाठी महामंडळाने आणलेली वर्क फ्रॉम नेचर ची संकल्पना अफलातुन आहे. मित्रमंडळी आणि परिवारासोबत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत काम करणे ही सुसंधी मिळाल्याने आणि सदर संकल्पनेसाठी सवलत ही मिळाल्याने खुप आनंद झाला. कोयना धरणाचा आणि अभयारण्याचा सुंदर परिसर आणि रुचकर भोजनामुळे सुटटी मार्गी लागल्याचे समाधान मिळाले” असे उद्घाटनानंतर अरिफ अत्तार यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी तसेच मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे उत्साही स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे.