व्हीएसआरएस न्युज पिंपरी- मरकळ येथील एका खासगी कंपनी मध्ये ३२ रुग्ण कोरोना बाधित आढळले .
त्यामुळे मरकळ ग्रामपंचायत मध्ये बाधितांची संख्या एकदम वाढली.
विशेष म्हणजे कंपनी चा लेबर पुरवणारा ठेकेदाराने ही माहिती प्रशासना पासून लपवून ठेवली होती . सर्व बाधित रुग्ण कंपनीचे एका गोदामात राहत होते .ही बाब उघड झालेने तात्काळ या घटनेची खेड आरोग्य सेवा प्रशासनाने घेतली. व तात्काळ मरकळ येथील कंपनीत पथक दाखल झाले. या पाहणीत स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक व्ही.एम मागाडे , पंचायत समिती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे , सभापती भगवान पोखरकर , माजी सभापती अंकुशभाऊ राक्षे, पंचायत समिती सदस्य अरूण चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.इंदिरा पारखे, डॉ. श्रुतीका रासकर,आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्र्वर आढाव., उद्योजक रणधीर सुर्वे, तलाठी महेंद्रसिंह ठाकूर यांनी पाहणी केली.
यावेळी कंपनी ला नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या सर्व रुग्ण म्हाळुंगे कविड सेंटर मध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेतली या मुळे भविष्यातला धोका टळला.या कारवाईने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.