व्हीएसआरएस न्युज कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदाने पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. अशातच आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
आश्विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
दिपावलीचा पहिला सण वसुबारस निमित्त गोमाता_पूजन कुदळवाडी मेन चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते प्रभागा मधील अनेक महिलांनी गोमातेचे पूजन केले.
कुदळवाडी परिसरातील महिलाना गोमातेची पुजा करता यावी या साठी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी चंद्रभागा गोशाळा मधील गोमाता कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिर चौकात पुजनाची व्यवस्था करण्यात आली होती
परिसरातील अनेक महिलानी गोमातेची पुजा करून नैवेद्य दाखवून दर्शन घेतले यावेळी रामकृष्ण लांडगे ,राजेश्वर पाठक,रोहन यादव,किशोर लोंढे, रामकुमार पासवान, गौरव त्रिपाठी, पांडुरंग यादव,कुंदन गुप्ता,मोईद शेख हे नागरिक उपस्थित होते