व्हीएसआरएस न्युज -राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या निवडी जाहीर ,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नवयुवतींचे संघटन बलशाली करण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पुजा बुट्टे पाटील यांनी निशा वैभव पवार यांची मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली असून तसे निवडीचे पत्र दिले आहे.
मावळ तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी सौ. सुवर्णा चंद्रकांत घोलप , टाकवे- वडेश्वर गट अध्यक्ष पदी सौ. सविता बबुशा भांगरे, टाकवे गण आध्यक्ष सौ. मनिषा नवनाथ भसे , वडेश्वर गण आध्यक्ष पदी सौ. शुभांगी दरेकर व नवलाख उंबरे गावच्या आध्यक्ष पदी सौ.शोभा नामदेव शिर्के यांची निवड पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या आध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या उपस्थितित जाहीर करण्यात आली.
निवडीचे पत्र देताना उपस्थित जिल्हा अध्यक्षा सौ.वैशालीताई नागवडे , pdcc बँकेच्या उपाध्यक्षा सौ.आर्चनाताई घारे ,पुणे जिल्हा परिषद सभापती मा. बाबुराव आप्पा वायकर , मावळ तालुका आध्यक्ष मा. बबनराव भेगडे , ग्रामीण आध्यक्ष मा. सुभाषराव जाधव , जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभाताई कदम , माजी सभापती सौ. हेमलताताई काळोखे , तळेगावच्या उपनगराध्यक्षा सौ. वैशालीताई दाभाडे , मावळ महिला आध्यक्षा सौ. सुवर्णाताई राऊत , माजी पंचायत समिती सदस्या सौ.ललिताताई कोतुळकर , सौ.उमाताई शेळके , सौ. शैलजाताई काळोखे , सौ. सुनिताताई काळोखे , सौ.मंजुश्री वाघ , सौ.शितलताई हगवणे , सौ.ज्योतीताई जाधव उपस्थित होते.