व्हीएसआरएस न्युज -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे.
त्यानंतर हळूहळू महाराष्ट्र अनलॉक होण्यास सुरूवात झाल्याने सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात निर्बंध शिथील व टाळेबंदी टप्याटप्याने उठविणे ( मिशन बिगिन अगेन ) संदर्भात कोविड – १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत . त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पासुन म्हणजे येत्या सोमवार पासून सुरु करणेबाबत सुधारित आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज शहरातील सर्व शाळांना दिले आहेत.
शाळा सुरु करण्यापुर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश देखील यामध्ये समावेश आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे पालन करण्यात यावे . विद्यार्थांच्या उपस्थिती बाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.