व्हीएसआरएस न्युज -श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे विविध खेळांची जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक 24 ते 31 मार्च रोजी डेरवन, चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले .
डी आय सी इंग्लिश मीडियम स्कूल मधील कु.आसावरी पाटील हिने आर्टिस्टिक जिम्नास्टिक या क्रीडा प्रकारात फ्लोर एक्झरसाइज व अनइव्हन बार मध्ये ब्राँझ पदक मिळविले हर्षित देशमुख याने वॉल्टींग टेबल व ऑल राउंड मध्ये ब्राँझ पदक मिळवले.
या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड मधील एलीट फिटनेस अकॅडमी च्या मुला-मुलींनी आर्टिस्टिक जिम्नास्टिक व रिदमिक जिम्नास्टिक या क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन उत्तुंग भरारी घेतली आहे
वय वर्षे १०,१२,१४
अशा विविध वयोगटात मुला-मुलींनी एकूण १५ गोल्ड ९सिल्वर १३ ब्राँझ अशी ३७मेडल्स मिळवली*
या स्पर्धेचे बक्षीस वितरण जिम्नास्टिक मधील अंतरराष्ट्रीय खेळाडू कु. श्रद्धा तळेकर यांच्या हस्ते झाले
अशा विविध स्पर्धेतून जिम्नास्टिक मध्ये भरारी घेणाऱ्या मुला मुलींमुळे आज पिंपरी-चिंचवडचे नाव नावारूपाला येताना दिसत आहे .
या सर्व मुला-मुलींना एलिट फिटनेस अकॅडमीचे कोच श्री.मनोज काळे ,सौ. प्रिया जोशी,सौ. मोनिका काळे, श्री.लक्ष्मण नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.