व्हीएसआरएस न्युज तढेगाव- साजिद शेख वाढदिवसाचे ओचित्य साधून अनाठायी खर्च न करता, करोना महामारीच्या काळात युद्धपातळीवर काम केलेल्या डॉक्टर्स,परिचारिका,वॉर्ड बॉय,सिक्युरिटी,यांचा 3लक्ष रुपये पर्यंत मोफत विमा काढून देण्यात आला त्याचप्रमाणे भविष्यात वाढत्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्या सर्वांला 3लाख रु चे विमा संरक्षण काढुन देणार असल्याचे यावेळी मा.मंत्री बाळाभ भेगडे यांनी घोषणा केली.
यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, डॉ.गुणेश बागुडे,डॉ.पदमवीर थोरात,मावळ भाजपा प्रसिद्धीप्रमुख अनंता कुडे,नगरसेविका शोभा भेगडे,नगरसेवक अरुण भेगडे,गटनेते अमोल शेटे,मा.नगरसेवक अयुबभाई शिकिलकर,मा.जमीर नालबंद,उद्योजक बंटीदादा भेगडे,केदार भेगडे,प्रतीक भेगडे,सोहेल शिकीलकर,सर्फराज नालबंद,मन्सूर शहा,अतुल शिंदे,इरफान नालबंद,राहील मणियार,साजिद शेख मित्र परिवार आदीजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे व प्रास्ताविक व आभार केदार भेगडे यांनी मानले.