व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -आज अभिनेत्री आसावरी जोशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अभिनेत्री आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून घरोघरी पोहचल्या आहेत. आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटही केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहेत यात काही दिवसांपूर्वी सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, प्रयदर्शन जाधव, विजय पाटकर, सिध्देश्वर झाडबुके, सुरेखा पुणेकर यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला आहे.