व्हीएसआरएस मराठी न्युज –रमजानचा (Ramadan) महिना यंदा भारतामध्ये 23 मार्चपासून होत आहे. 23 मार्चला रमजानचा चांद पाहिल्यानंतर 24 मार्च अर्थात शुक्वार पासून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू होणार आहेत.
रमजानच्या चांद वर रमजान महिन्यातील रोजे कधी सुरू होणार याचं गणित बेतलेलं असतं. 22 मार्चला चंद्रदर्शन झाल्यास 23 मार्चपासून रोजांना सुरूवात होणार आहे. अल्लाह कडे चूकांची कबुली देत प्रार्थना केली जाते. घरात सुख, समृद्धी रहावी म्हणून दिवसरात्र नमाज पठण, कुराण पठण केले जाते.
- दिवसभर उपवास ठेवायचा आणि सूर्यास्तानंतर इफ्तार करायचा म्हणजेच उपवास सोडायचा. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पुन्हा रोजा सुरू करायचा हा असा नित्यक्रम तब्बल एक महिना चालतो.
इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना म्हणून रमजान महिन्याकडे पाहिलं जातं. रमजान हा इस्लाममध्ये अतिशय पवित्र महिना म्हणून पाहीला जातो. रमजानच्या सुरूवातीपासून रोजे म्हणजेच उपवास ठेवण्यास सुरूवात होते. दिवसभर उपवास ठेवायचा आणि सूर्यास्तानंतर इफ्तार करायचा म्हणजेच उपवास सोडायचा. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पुन्हा रोजा सुरू करायचा हा असा नित्यक्रम तब्बल एक महिना चालतो.
मात्र रोजा कधी सुरू करायचा याबाबतही काही नियम आहेत. इस्लाममध्ये चंद्राला विशेष महत्व दिलं गेलं आहे. चंद्र हा पवित्रता आणि आत्म-प्रतिबिंब याचं प्रतीक मानलं गेलं आहे. इस्लामिक कॅलेंडर चंद्राभोवती फिरते. म्हणूनच इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राचे टप्पे पाळले जातात. त्यामुळेच अमावस्येनंतर होणारा चंद्रोदय मुस्लिम बांधवांसाठी अत्यत महत्वाचा असतो. एकदा चंद्रकोर दिसली की त्याच्या दुसऱ्या दिवशी रोजे सुरू करायचे असा प्रघात आहे. जोवर चंद्रकोर दिसत नाही तोवर रोजा ठेवला जात नाही. ज्या संध्याकाळी चंद्र दर्शन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोजे ठेवायला सुरूवात होते.
भारतीय वेळेनुसार, चंद्रकोर चंद्र २२ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी उदयाला येईल. त्यामुळे २२ मार्च रोजी चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मार्च रोजी रमजानचा पहिला उपवास पाळला जाईल. काही कारणास्तव २२ मार्चला चंद्र दिसला नाही तर २४ मार्चपासून उपवास सुरू होईल.
Discussion about this post