व्हीएसआरएस मराठी न्युज दिल्लीजवळच्या केएमपीएल जवळ हा अपघात झाला.
ते दिल्लीहून भटिंडा येथे जात होते. त्यांच्या गाडीची ट्रकशी टक्कर झाली.
पंजाबमधल्या मुक्तेसर साहिब जिल्ह्यातील उदेकरण हे दीप सिद्धूंचं मूळ गाव. दीप सिद्धू यांचे वडील सरदार सूरजित सिंह वकील होते आणि आम्ही सहा भावंडं होतो, असं दीप यांच्या भटिंडामध्ये राहणाऱ्या काकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
“सूरजित सिंह यांना तीन मुलं आहेत. यापैकी नवदीप सिंह कॅनडात आहे. मनदीप कायद्याचं शिक्षण घेतोय आणि दीप दिल्लीत शेतकरी आंदोलनात सहभागी आहे.”
आमचं कुटुंब शेती करत असल्याचं दीप सिंह यांचे काका बिधी सिंह सांगतात. मात्र, दीप यांचे वडील सूरजित सिंह लुधियानात वकील होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाल्याचंही बिधी सिंह यांनी सांगितलं.
दीपविषयी सांगताना बिधी सिंह म्हणाले, “तो कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेला होता. त्यानंतर तो मुंबईत स्थायिक झाला. तिथेच त्याने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.”
दीप मुंबईत चांगलाच स्थिरावला होता, असंही बिधी सिंह सांगतात. दीपने सुरुवातीला बालाजी फिल्म्ससाठी वकील म्हणून काम केलं. पुढे हळूहळू तो देओल कुटुंबाच्या जवळ गेला आणि तिथूनच त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाल्याचंही बिधी सिंह सांगतात.
दीप यांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगीही आहे.
Discussion about this post