व्हीएसआरएस न्युज राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले, ते 93 वर्षांचे होते. सध्या त्यांच्या पत्नीवरही दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कॉंग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची देशभरात ओळख होती. पहाडिया यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे.
गेहलोत यांनी ट्विट केले आहे की,’राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. पहाडीया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये होते.
गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, पहाडीया करोनामुळे आमच्यातच राहिले नाहीत. त्यांच्या मृत्यूने मला धक्का बसला. तसेच माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.’
दरम्यान, जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. सरकारी कार्यालयातही दुखवटा पाळण्यात येईल. तसेच, मंत्रिमंडळा बैठकीत पहाडिया यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.