व्हीएसआरएस न्युज लखनौ – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिल्यामुळे आभार मानले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा केली होती. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुकही केले होते, उदयनराजेंनी तेव्हा योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधत लवकरच तुमची भेट घेणार असल्याचे सांगितले होते, त्यानंतर ही भेट शनिवारी घेण्यात आली.
उदयनराजे यांनी याबाबत फेसबुकवरून पोस्ट करत सांगितले की, अखंड हिंदुस्तानचे छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत.
संपूर्ण जगात त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाला गुलामगिरीतून मुक्त केल्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला या उत्तर प्रदेशात स्थान नाही. म्हणूनच आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असून या संग्रहालयच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल. असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे मुख्यमंत्री निवासस्थानी केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव देण्याची घोषणा केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज या नात्याने त्यांच्या या निर्णयाबद्दल राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. या संग्रहालयाचे भूमिपूजन जानेवारी २०१६ मध्ये झाले असून ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दिड किमी अंतरावर हे संग्रहालय उभे राहणार आहे. सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यानां औरंगजेबने आग्रा येथे कैदेत ठेवले होते. पण शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आग्राहून सुटका केली. याचा प्रेरणादायी या संग्रहालयात मांडला जाणार आहे.
आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.