व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -एटीएम फोडणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली.
अटक करण्यात आलेले दोघेही खेड तालुक्यातील रहिवासी आहेत. भानुदास अण्णा दिघे (वय २३, रा.कोयाळी) व चैतन्य पांडुरंग चौधरी (वय २२, सध्या रा. कोयाळी, ता. खेड, मूळ-अहमदनगर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलिस शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास गस्त घालत असताना काही एटीएम उघडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यावेळी लगतच्या भागात संशयित अधले. दोघांना पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकाजवळ त्याला पकडले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. .
Discussion about this post