प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे.दोन्ही फलाटं रिकामी करण्यात आली आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे. संबंधित वस्तू रेल्वे स्टेशनच्या नजीकच्या मैदानात नेण्यात आली आहे. ताबडतोब पोलीस याठिकणी पोहोचले. बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या पथकाने तत्काळ कार्यवाहीला सुरुवात केली.
रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या आहेत. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची वर्दी मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता याठिकाणी तातडीने पोहोचले.
तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे फलाटावर प्रवाश्यांना फिरकण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोऱ्यांच्या सहाय्याने या ठिकाणी बॅरिगेडिंग करण्यात आले.
याशिवाय पुणे स्टेशनच्या परिसरातील वर्दळ कमी करण्यात आली आहे.
याशिवाय पुणे स्टेशनच्या परिसरातील वर्दळ कमी करण्यात आली असून नागरिकांना स्टेशनपासून लांब करण्यात आलंय. अनेक प्रवाशांना स्टेशन परिसरातून बाहेर काढण्यात आले. पुणे स्टेशन वर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. शहरातील मोठे अधिकारी या ठिकाणी काही वेळात पोहोचले. व रेल्वे स्टेशन परिसराची तपासणी करू लागले.
Discussion about this post