व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.२० आषाढी यात्रा नियोजना करिता भक्त निवास संस्थान येथे ११ मे रोजी प्रांत आधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीत त्यांनी पालिका प्रशासनास वारी सोहळ्या साठी आळंदीत येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेची कामे व शहरातील काही दुरावस्थेत असलेल्या
सोयी सुविधा कामे असतील तर ती पूर्णपणे व्यवस्थित करण्याच्या सूचना आदेश दिले.भाविकांसाठी शौचालय अपुरे पडू नये याकरिता संस्थान ने विविध ठिकाणी भाविकांसाठी फिरते शौचालयाची मागणी केली होती.
परंतु आळंदीत लाखो रुपये खर्च करून चार नंबर शाळे शेजारी पालिकेने स्वच्छतागृह बांधले आहे.त्याकडे कित्येक दिवस पालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.स्वच्छतागृहा जवळच झाडे झुडपे वाढून आलेली दिसत आहे.
संरक्षण भिंतीच्या कडेला कचऱ्याचे ढीग आढळत आहेत.
वापराविना हे स्वच्छतागृह
दुरावस्थेत दिसत आहे. त्याची व्यवस्थित पणे निगा राखल्यास, तिथे पाण्याचे नियोजन केल्यास कायमस्वरूपी स्थानिक नागरिकांसाठी व आषाढीवारी करता येणाऱ्या भाविकांसाठी ते उपलब्ध होईल.
श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मागे असणाऱ्या स्वच्छता गृहात एका शौचालयात नळ नाही व वॉश बेसिन मधील नळ दुरुस्त नाही.त्या स्वच्छता गृहांमध्ये पाणीव्यवस्था व्यवस्थित पणे नसल्याचे दिसून येते.
वडगांव रस्त्यावर मोठे स्वच्छतागृह उभारले असून ते पण दुरावस्थेत
असल्याचे दिसून येते.स्वच्छतागृहात खालच्या मजल्यावर ५ वॉश बेसिन ला व काही शौचालयामध्ये नळ नसल्याचे दिसते.स्वच्छता गृहातील सिलिंग टाइल्स ही दुरावस्थेत आहेत.मुताऱ्या अस्वच्छ अवस्थेत आहेत.
मरकळ रस्त्यावरील एस के इव्हेंट्स हॉल समोरील गटार लाईन कित्येक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत आढळून येत आहे. तेथील एका नागरिकाने नगरपालिकेत तोंडी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.तेथील रहिवाश्यांना कित्येक दिवस त्या दुर्गंधीचा व त्या घाण पाण्यातून ये —जा करण्याचा त्रास होत आहे. पद्मावती रस्त्यावर तुळजा भवानी
बँकेसमोरील कित्येक दिवस ड्रीनेज तुंबलेल्या अवस्थेत आहे.
जुना पूल ते देहूफाटा पर्यंत काही पथदिवे बंद अवस्थेत आहेत.
आषाढी वारी सोहळ्यासाठी अवघा एक महिना राहिला असून काही स्वच्छतागृहे दुरावस्थेत, काही पथदिवे बंद अवस्थेत तर काही ठिकाणी ड्रीनेज लाईन तुंबलेल्या अवस्थेत दिसत आहेत.हजेरी मारुती मंदिराजवळ फूटपाथवर पाईपलाईन पाणी गळती व सिद्धबेट जवळील बंधाऱ्यावर पिण्याच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याचे दिसून येत आहे. ही सर्व कामे महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आव्हान नगरपालिके समोर उभे राहिलेले दिसून येत आहे.
Discussion about this post