पिंपरी । व्हीएसआरएस न्यूज ।
चौकात जातो म्हणून घराबाहेर पडलेला 27 वर्षीय युवक गेल्या महिन्यापासून घरी परतलाच नाही. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. (सागर बजरंग धनवट गणेश हाऊसिंग सोसायटी, नेवाळेवस्ती चिखली) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तर युवकाचे वडिल बजरंग विठ्ठल धनवट वय 49 यांनी तक्रार दिली आहे.
अंगाने मजबूत, रंगाने गोरा, 6 फूट उंची, डोक्याचे काळे केस, वाढलेली मिशी, तलवार कट, दाढी काळी, वाढलेले नाक, डोळे काळे, गोल चेहरा, शिक्षण बिए, बोली भाषा मराठी,तेलगु, हिंदी, इंग्लिश, अंगावर मोरपंखी रंगाचा फुल हाताचा शर्ट, निळसर रंगाची जीन्स, पायात राखाडी रंगाचा शूज असे त्याचे वर्णन केले आहे. सोबत 500 रुपये विवो कंपनीचा मोबाईल व त्यामध्ये व्होडाफोन कंपनीचे सिम कार्ड आहे. (7218726478) आहे. चौकातून घरी परत येतो असे संगून गेला तो परत आलेलाच नाही, अशी माहिती बजरंग धनवट (युवकाचे वडिल) यांनी व्हीएसआरएस न्यूजला दिली.
बेपत्ता झालेल्या युवकाशी कोणीही आर्थिक व्यवहार, मैत्रिपूर्ण संबंध किंवा प्रेमसंबंध करू नये तसेच या युवकाकडून कोणत्याही बाबतीत झालेल्या घटनेशी त्याच्या कुटुंबियांचा संबंध नसून, त्याची जबाबदारी आमची नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.
Discussion about this post