व्हीएसआरएस मराठी न्युज -काँग्रेस पक्षाच्या सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारसरणीवर विश्वास ठेवत सिद्धार्थ वानखेडे हे काम करत आलेले आहेत खरं बोलायचं झाल्यास सिद्धार्थ वानखेडेंची राजकारणाची सुरुवात एन. एस. यु. आय च्या माध्यमातून काँग्रेस पक्षात झाली,
आणि नंतर युवक काँग्रेस आणि आता सोशल मीडिया या विभागात काम करत असतांना अगदी प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षासाठी काम करत आले. कधीही कुठल्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले नाही तर पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली व त्यांच्या कार्याची कॉग्रेस पक्षाने दखल घेऊन सोशल मिडिया विभागाच्या राज्य सचिव पदी निवड करण्यात आली.
व यापुधेसुद्धा पक्षासाठी काम करत राहील अशी ग्वाही देऊन बौध्द समाजातील माझ्यासारख्या एका सर्वसामान्य युवकाला ज्याची कुठलिही राजकिय पाश्वभूमी नसलेल्या युवकाला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा मनापासून आभारी आहे अशी भुमिका सिद्धार्थ वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केली.
Discussion about this post