व्हीएसआरएस मराठी न्युज -15 राज्यांमधून निवडून आलेल्या राज्य सभेच्या 57 सदस्यांचा कार्यकाळ जून-ऑगस्ट 2022 दरम्यान संपणार आहे. 10 जून रोजी निवडणूक होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
15 राज्यांमध्ये असलेल्या राज्यसभेच्या 52 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. प्रत्येक राज्यात प्रत्येकी सहा जागांसाठी निवडणूक होत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरात राजकीय घुसळन होणार हे निश्चित.
Discussion about this post