व्हीएसआरएस मराठी न्युज-(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.१० आळंदी हद्दीतील अतिक्रमणा विरोधात दुसऱ्या दिवशी प्रदक्षणा रस्ता व मरकळ रस्त्यावरील हातगाडया तसेच फूटपाथ वरील टपऱ्या,बांबूच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली दुकाने यावर आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने आज बेधडकपणे कारवाई केली.
फूटपाथ वरील काही टपऱ्या परत अतिक्रमण करू नये म्हणून जेसीबी च्या सहाय्याने मोड तोड करून तेथून नाहीश्या करण्यात आल्या.फूटपाथ वरील अनधिकृत फ्लेक्स ,बोर्ड काढण्यात आले.आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागातील आधिकारी, कर्मचारी या
कारवाई वेळी उपस्थित होते.कर्मचारी वर्ग हे
फूटपाथ वरील फ्लेक्स,रस्त्यावरील हातगाड्या ,मोडतोड झालेल्या वस्तू टॅक्टर मध्ये भरताना चे चित्र दिसले.आळंदी नगरपरिषद अतिक्रमण विभागाचे ,सचिन गायकवाड साहेब, अरुण घुंडरे यावेळेस म्हणाले फूटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर
पुढील काही दिवस सातत्य पूर्ण
कारवाई करण्यात येणार आहे.
तरी फुटपाथ व रस्त्यांवर हातगाडी,टपऱ्या, दुकाने लावू नयेत.आळंदी हद्दीतील रस्त्यांवर व फुटपाथ वर अतिक्रमण केल्यास त्याची माहिती मिळावी यासाठी विशेष कर्मचारी वर्गाची नेमणूक केली आहे.अतिक्रमण विभागाचे विशाल बासरे पण येथे उपस्थित होते.याबद्दल अरुण घुंडरे यांनी माहिती दिली.
फुटपाथ वरील अतिक्रमण
काहींनी स्वतःहुन काढले. काही दुकानदारांना म्हणजेच अन्नधान्य दुकान, फळवाले व्यासायिक दुकानदार,यांना त्यांचे नुसकान होऊ नये म्हणून सक्त ताकीद देऊन अतिक्रमणे काढण्यास भाग पाडले.
Discussion about this post