व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. रमेश लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्यासाठी गेले होते.
त्यादरम्यान ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे रमेश लटके यांचं निधन झालं. रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून दु:ख व्यक्त केलं जात आहे.
तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.
Discussion about this post