व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर पाटील यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली.
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर पाटील यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट केले की, सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर मी कोविड-19 चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मी कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. माझी प्रकृती स्थिर आहे आणि मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. पाटील यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.
दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट केले की, नागपूर आणि अमरावती दौऱ्यात आणि इतर कार्यक्रमादरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करतो की, त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.
Discussion about this post