व्हीएसआरएस न्युज पिंपरी नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे.
या तिघींच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुली या कोविडबाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.
नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे.
हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर 2021 या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्यांनी कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.
Discussion about this post