व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुढील महिन्यात 14 आणि 15 तारखेला मुंबईतील बीकेसी मैदानावर (bkc ground mumbai) शिवसेनाच मेळावा पार पडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेंची तोफ चौफेर धडाडणार आहे. सभेला उत्तर सभेतूनच देईन असं म्हणत दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्याबद्दल घोषणा केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जाहीर सभा घेण्याचे निश्चित केले आहे. याच सभेद्वारे उद्धव हे राज यांना अतिशय जोरदार प्रत्युत्तर देण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, उद्धव यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे. सध्या त्या खुप कमी प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात. त्यावरुन विरोधकांकडून मोठी टीका होत असते. लवकरच मी राज्याचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यास आता ते १४ मे पासून सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची ३० एप्रिलला पुण्यात जाहीर होणार आहे. पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस नेत्यांची सभा होणार आहे. या सभेला निर्धार सभा असे नाव देण्यात आले आहे. पुण्यात ३० एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १ मे रोजी राज ठाकरेंकडून मविआ सरकारला टार्गेट केले जात असतानाच दुसरीकडे मविआची निर्धार सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर कॉंग्रेसकडून यशोमती ठाकुर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेकडून मंत्रीमंडळातील मंत्री तसेच संजय राऊत यांना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती आहे.
Discussion about this post