व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी:- जीव वाचवण्यासाठी कोरोना काळात कोणत्याही जात-धर्म न पाहता प्लाझ्मा दान केले.आज शहरात सलोख्याचे वातावरण कायम ठेवणे आपली जबाबदारी आहे. असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
चिखली येथील नूर ए इमान सोशल तेहरीक (निस्ट) च्या वतीने सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी महापौर राहुल जाधव,कार्तिक लांडगे,माजी नगरसेवक मुकुंद गायकवाड,माजी नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव,माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव,नूर ए इमान सोशल तेहरीक चे अध्यक्ष फिरोज शेख,इसाक शेख, स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे, सदाशेठ नेवाळे, विठ्ठल मोरे, बाळासाहेब मोरे, रविशेठ नेवाळे, दत्ताञय मोरे , विनायक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिरोज शेख यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत पुंड तर आभार इसाक शेख यांनी मानले.
Discussion about this post