व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथाला यंदा मान
पांडुरंग वरखडे व तान्हाजी वरखडे या वरखडे कुटुंबीयाना मिळाला आहे.आज श्री नृसिंव्ह सरस्वती स्वामी मठ येथे माऊलींची रथाची बैलजोडी सोन्या माऊली यांचे विधिवत गांधी परिवाराकडून पूजन करण्यात आले. धुमधडाक्यात, फटाक्यांच्या आतिष बाजीत,बँड व वाजंत्रीच्या वाद्याने अशी भव्य मिरवणूक आळंदीत काढण्यात आली.यावेळी विविध ठिकाणी बैलजोडी चे पूजन करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा पर्यंत मिरवणूक काढून तिथे ही बैलजोडी चे पूजन करण्यात आले.संस्थांनच्या वतीने वरखडे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी
सोहळा प्रमुख विकास ढगे,विश्वस्त अभयजी टिळक ,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे मानकरी व
आळंदी ग्रामस्त बहुसंख्येने उपस्थित होते.
Discussion about this post