व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-आळंदीमध्ये पोलीस प्रशासन संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळ्या करिता सज्ज झाले आहेत.वारी काळात विविध चौकात नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस मदत केंद्रे उभारली आहेत.
आषाढी वारी काळात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या करीता आळंदी शहरात राज्यातून विविध ठिक ठिकाणा वरून मोठ्या संख्येत भाविक येतात.त्यामुळे आळंदी शहराच्या रस्त्यांवर गर्दी होत असते.याचा गैरफायदा भुरटे चोर घेण्याची शक्यता असते.ड्रोन कॅमेरा व ड्रोन सदृश कॅमेरा याने पालखी सोहळा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यास मज्जाव आदेश पसिद्धीसाठी प्राप्त झाला आहे.पालखी मार्गावर दुकाने लावण्यास बंदी घातली आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास आळंदी पोलीस यांनी करवाई करावी असे आदेश मिळाल्याची माहिती आळंदी पोलीस प्रशासना कडून प्राप्त होत आहे.
Discussion about this post