व्हीएसआरएस मराठी न्युज –संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट जाधववाडी संस्थापक अध्यक्षा सीताताई राम केंद्रे यांच्याकडून ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जाधव वाडी येथे ज्या मुलांचे आई वडील कोरोना मध्ये देवाज्ञा झाली आहेत. त्या मुलांना संघर्ष मंडळ ट्रस्ट तर्फे शाळेची वार्षिक फी व शालेय वस्तू देण्यात आले आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्षा सीता राम ताई केंद्रे, सौ. माया दत्तात्रय सांगवे सौ सविता कदम सवित्रा कांगणे व श्री दत्तात्रय सांगवे ओम डांगे व मंडळाचे सर्व सभासद आदी कार्यकर्ते उपस्थित होते
ट्रस्टच्या अध्यक्षा सिताताई राम केंद्रे यांनी बोलताना सांगितले प्रत्येक वर्षी आम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असतो कोरणा काळातही त्यांनी असंख्य कुटुंबांना मदत केली आहे.
सीता केंद्रे यांचं जाधव वाडी परिसरामध्ये सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावरती आहे, नुकताच त्यांनी काही दिवसा पूर्वी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हा प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. ओबीसी समाजासह त्यांच त्या भागामध्ये मोठ्या संघटन आहे.
Discussion about this post