व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातुन शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून भारतरत्न अटलबिहारी उद्यान , पुर्णानगर व इतर उद्यानातही जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देवुन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मा नगरसेवक एकनाथ पवार यांनी केली.
पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातुन शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात . या वर्षी नुकतेच जेष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा साधन म्हणून रंगीत टेलीव्हिजन संच मोफत देण्यात आलेले आहेत .
असे असताना भारतरत्न अटविहारी उद्यान , पुर्णानगर येथे मात्र जेट नागरिकांकडुन प्रवेशासाठी र.रु. २० / – इतके शुल्क आकारले जात आहे . जेष्ठ नागरिक हे संध्याकाळ विरंगुळ्यासाठी उद्यानात येत असतात . त्यांना प्रत्येक दिवशी प्रति प्रवेशावेळी रु .२० शुल्क भरणे शक्य होणार नाही . त्यामुळे त्यांचा विरंगुळाच महापालिकेने हिरावुन घेतला आहे . जेष्ठ नागरिकांना भारतरत्न अटबिहारी उद्यान , पुर्णानगर येथे मोफत प्रवेश दिल्यास त्यांना त्या ठिकाणी विरंगुळा करणे शक्य होईल .
Discussion about this post