व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मनाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व प्रवीण मसाले उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, चांदीची मुद्रा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
Discussion about this post