व्हीएसआरएस मराठी न्युज –दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान ‘गोविंदबाग’ पुन्हा फुलला.
कोविडच्या संकटांमध्ये पाडवा शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुललीच नव्हती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच हे तीनही नेते नागरिकांना भेटणार आहेत. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेमध्ये या तीनही नेत्यांना पाडवा शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून लोक येत असतात. यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असतो. यावेळी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी, छायाचित्र काढण्याची संधीदेखील नागरिकांना मिळते.
Discussion about this post