व्हीएसआरएस मराठी न्युज –
०३.१२.२०२२ रोजी पोलीस मुख्यालय, निगडी येथे मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येणा-या “दिशा” या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाणे हद्दीतील वस्ती / झोपडपट्टी भागातील विविध कारणांमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांसाठी विशेष बाल पोलीस पथक गुन्हे शाखा यांचेवतीने तेरे देस होमस्, जर्मनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत व्यावसायिक प्रशिक्षण निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमामध्ये वस्ती / झोपडपट्टी भागातील १४ ते १८ वयोगटातील सुमारे १५० हून अधिक शाळाबाह्य बालकांनी आपला सहभाग नोंदवून विविध व्यवसायिक प्रशिक्षण मिळणेबाबत नावनोंदणी केलेली आहे. या बालकांचा कल तपासून त्यांचे आवडीनुसार कोहिनूर इन्स्टिट्युट, काळभोर नगर, आकुर्डी येथे १ महिना कालावधीचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये १. दुचाकी दुरुस्ती २ इलेक्ट्रिकल वायरमन ३. इलेक्ट्रिकल उपकरण दुरुस्ती ४. मोबाईल दुरुस्ती असे विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारक्षम करुन या बालकाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
या वेळी कार्यक्रमात बोलताना मा. श्री. अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी उपस्थित बालकांना “दिशा” हा उपक्रम तुमच्या उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून शाळाबाह्य बालकांना पुनःश्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांना त्यांचे आवडीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगारक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे व्यवसायिक प्रशिक्षण ग्रहण केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नविन दिशा येणार असल्याचे सांगुन ‘नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारे व्हा’ असे बोलून उपस्थित बालकांना मार्गदर्शन करुन आलेल्या संधीचा फायदा करुन घ्या, असे आवाहन केले.
या देवी कार्यक्रमात बोलताना मा. श्री. अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी
उपस्थित बालकांना “दिशा” हा उपक्रम तुमच्या उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून शाळाबाह्य बालकांना पुनः शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांना त्यांचे आवडीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगारक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण ग्रहण केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नविन दिशा येणार असल्याचे सांगुन नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारे व्हा’ असे बोलून उपस्थित बालकांना मार्गदर्शन करून आलेल्या संधीचा फायदा करून घ्या, असे आवाहन
केले. मा. श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त मुख्यालय यांनी अजाणतेपणामुळे काही अल्पवयीन बालके ही व्यसनाच्या आहारी जावून चुकीच्या संगतीमुळे नकळत गुन्हेगारी मार्गावर झुकत असून अशा बालकांना योग्य समुपदेशन व मार्गदर्शन होणे गरजेचे असलेबाबत सांगून आपल्या जीवनाचा खरा आदर्श कोण व कसा असावा याबाबत उपस्थित बालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
तेरे देस होमस, जर्मनी या बालकल्याण सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक श्री. मंदार शिंदे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने राबविण्यात येणा-या “दिशा” या उपक्रमाचे कौतुक करून, तेरे देस होमस् या संस्थेमार्फत या बालकाचा कल तपासून १ दुचाकी दुरुस्ती २. इलेक्ट्रिकल वायरमन ३. इलेक्ट्रिकल उपकरण दुरुस्ती ४. मोबाइल दुरुस्ती असे विविध मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगारक्षम करण्यात येणार असून पासाठी कोहिनूर इन्टिटयूट आकुर्डी यांचेसोबत एम.ओ.यू झाला असल्याचे सांगितले. याचबरोबर कोहीनूर इन्स्टिट्युटच्या मुख्य व्यवस्थापिका श्रीमती सारीका मुळे यांनी या बालकांना देण्यात येणा-या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमा विषयी उपस्थित सर्व बालकांना संपूर्ण माहिती करून दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती. प्रेरणा कट्टे सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे श्री. संपत निकम (श्रेणी-पोउप-निरी) मपोना / दिपाली शिर्के, पोशि/ कपिलेश इगवे, पोशि/ भुषण लोहरे यांनी केले
सदर कार्यक्रमास मा. श्री. अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचेसह श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), तसेच श्री. संपत मांडवे (मुख्य व्यवस्थापक, तेरे देस होमस् जर्मनी), श्री. मंदार शिंदे (समन्वयक तेरे देस होमस्, जर्मनी ) श्रीमती. सारीका मुळे (मुख्य व्यवस्थापक- कोहिनूर इन्स्टिटयुट, आकुर्डी) यांचेसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व वस्ती / झोपडपट्टी भागातील १५० हुन अधिक शाळाबाह्य बालक व समन्वयक पोलीस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post