व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील फुटपाथ अथवा रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांकरीता आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरीता Quick Heal Foundation –CSR च्या माध्यमातून Ambulance van चे हस्तांतरण आयुक्त तथा प्रशासक श्री शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त श्री जितेंद्र वाघ, श्री उल्हास जगताप, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री नीलकंठ पोमण, उप आयुक्तश्री चंद्रकांत इंदलकर, श्री मनोज लोणकर, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, रियल लाईफ रियल पीपल संस्थेचे एम.ए.हुसेन, सी.एस.आर सेलचे सल्लागार विजय वावरे आदि उपस्थित होते.
Discussion about this post