व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत 2 लाख 38 हजार 509 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, 8 लाख 48 हजार 389 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. पाच वर्षांखालील 52 हजार 992 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. व्हिटॅमिन एची मात्रा 27 हजार 808 बालकांना देण्यात आली आहे. 3 हजार 94 बालकांना गोवर रुबेलाचा पाहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.
नव्याने आढळलेल्या 13 बालरुग्णांमध्ये कुदळवाडीमधील 5, थेरगावमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय, शहरातील मोशी व अन्य भागात 6 रुग्ण आढळले आहेत. शहरात 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे 389 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post