व्हीएसआरएस मराठी न्युज -शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया लागू असणार्या शाळांची नोंदणीप्रक्रिया (दि.23) पासून सुरू झाली आहे. वस्तुनिष्ठ व अचूक माहिती शिक्षण संस्थाचालकांनी अद्ययावत करून नोंदणीप्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने केले आहे. शाळा नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येतील.
निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. जन्म तारखेचा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
Discussion about this post