व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे महापालिकेत एकूण ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पालिका आस्थापनेवरील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यासाठी दि. ८ ते २८ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
महापालिकेतील आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन दलातील रिक्त पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने या आगोदर ४४८ पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. महापालिकेच्या आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. इच्छुकांना महापालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर अर्ज करता येईल.
यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपये आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षेचे प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
Discussion about this post