व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पुण्यातील काही रुग्णालयांनी पुन्हा एकदा कारोना वॉर्ड सुरू केले आहेत. नोबेल हॉस्पिटल, के. ई. एम रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांना विलिगीकरणात ठेवले जात आहे. रुग्णसंख्या झापाट्याने वाढली तर रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे.
सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, मार्चमध्ये शहरात कोविड संसर्गामुळे तीन मृत्यू झाले आहेत. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि आम्ही दक्षता वाढवत आहोत. आम्ही आमच्या OPD मध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर्स उपलब्ध केले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी करण्याची नाही तर काळजी घेण्याची गरज आहे.
शहरातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि ऑक्सिजनची आवश्यकता याची नियमितपणे तपासणी केली जात आहे. गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये 65 वर्षांवरील महिलांचा समावेश होता. यापूर्वीही झालेल्या मृत व्यक्तींना एकापेक्षा जास्त गंभीर आजार होते.
Discussion about this post