व्हीएसआरएस मराठी न्युज –
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत.
दरम्यान, 28 मे रोजी नवीन संसद भवनासमोर महिला महापंचायत घेण्याचे पहिलवानांनी ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.
या महापंचायतीचे नेतृत्व महिलाच करणार असल्याचे विनेश फोगटने सांगितले. यासोबतच उठवलेला हा आवाज दूरवर जायला हवा, असेही ती म्हणाली. आज देशाच्या मुलींना न्याय मिळाला तर येणार्या पिढ्या हिंमत दाखवतील.
विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक आघाडीचे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
Discussion about this post