Pimpri News : पिंपरी : मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा देण्याकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा मोठा ताफा आज २४ जानेवारी रोजी सकाळी पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला.
शेकडो वाहने आणि हजारो कार्यकत्यांच्या समुदायाने ‘एक मराठा, लाख मराठा’ असा घोष करत शहरात प्रवेश केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मनोज जरांगे यांचे औक्षण करत स्थानिक महिलांनी त्यांना या लढ्यात यश मिळण्यासाठी शुभकामना दिल्या.
यावेळी काळेवाडी, पिंपरी परिसरातील मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीला सक्रीय पाठिंबा जाहीर करत मुंबईकडे कूच करणार्या आंदोलकांना पाणी, फळे आणि अल्पोपहार यांचे वाटप केले.
यावेळी बोलताना मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी म्हटले की, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला सक्रीय पाठिंबा आहे. मराठा समाज मुस्लिम समाजाच्या मागे कायम मोठ्या भावाप्रमाणे उभा राहिला आहे. आज आम्ही मराठा समाजामागे लहान भावाप्रमाणे उभे राहत आहोत. फक्त पिंपरी चिंचवडमध्येच नव्हे तर, मुंबईपर्यंतच्या मार्गावर सर्वत्र आम्ही मराठा आंदोलकांना तन, मन आणि धनाने पाठिंबा देऊ.
Discussion about this post