Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटातील कोणता गट पक्ष आहे याची सुनावणी आज १५ फेब्रुवारी रोजी सुरू होती. यावेळी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळल्या असून संख्याबळाच्या आधारावर अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे.
या निष्कर्षाप्रत येताना नार्वेकर यांनी नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे स्पष्ट होत नसल्याचे नमूद करत विधीमंडळातील संख्याबळानुसार हा निष्कर्ष काढल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा असून शरद पवार यांच्या गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेले नाही. दोन्ही गटांचे संख्याबळ स्पष्ट आहे. अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अजित पवार गटच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे.
Discussion about this post