Pimpri News : पिंपरी : निगडी से.२२ येथे कमल घोलप सोशल फाउंडेशन आणि हेल्पएज इंडिया यांच्यामार्फत गरजू व्यक्तींसाठी मोफत फिरते रुग्णालय उपलब्ध करण्यात आले होते. यावेळी गरजूंना व्हीलचेअर तसेच दिव्यांगांना मोफत काठ्यांचे वाटप करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,निगडी से.२२ येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर व सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. या शिबिरात सर्व आजारांची मोफत तपासणी आणि एक महिन्यांची औषधे मोफत देण्यात आली. तसेच आरोग्य शिबिरात दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वॉकर्स आणि काठ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. रुपाली वाळूंज, डॉ.नीता कुलकर्णी, नगरसेविका कमल घोलप, उद्योजक बाप्पू घोलप,सामाजिक कार्यकर्ते राकेश बावणे, संतोष लष्करे,अरुण कांबळे, किरण गंडले आदी उपस्थित होते.
Discussion about this post