Pune News : पुणे : चैनीखातर वाहनचो-या करणा-या अल्पवयीन मुलांना पुण्यातील माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
वारजे माळवाडीचे उपनिरीक्षक संभाजी दराडे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना कॅनॉल रोडवरील खान वस्तीजवळ लाल रंगाची मोटारसायकल चालवणारा मुलगा दिसला. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे दिसून आले. त्याच्या पालकांसमोर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने आणखीही काही मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर चैनीखातर चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून १० मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त भीमराव टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे, निरीक्षक (गुन्हे) नीलकांत जगताप, रणजित मोहिते, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय बुरुख, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामटे, सत्यजित लोंढे यांनी केली.
Discussion about this post