Pimpri News : पिंपरी : सोसायटी, कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, सभांडप आणि मंदिर सुशोभिकरणाच्या कामासह विविध ६ विकासकामांना आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चालना देण्यात आली. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांसाठी भोसरीत ‘सुपर संडे’ ठरला, अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चऱ्होली, मोशी आणि दिघी या भागातील विविध प्रस्तावित विकासकामांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या ‘आमदार निधी’तून करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.
रुपीनगर तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभामंडप, शिवशक्ती हाउसिंग सोसायटी, सहयोगनगर येथील श्रीगणेश मंदिर आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ चव्हाण वस्ती येथे सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, दिघीतील श्रीराम कॉलनी, भारतमाता नगर, गणेश कॉलनी आणि डुडूळगाव येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले.
रुपीनगर, तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजनन वाघामोडे, सचिव राजेंद्र सोनटक्के, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, दत्ता करे, कार्याध्यक्ष शिवाजी बिरके, खजिनदार संजय रुपनवर, सहखजिनदार संजय मोगे, नाना गावडे, सचिन नायकुडे, दयानंद सोनटक्के, विनोद नवसे, रमेश हिवरे, विश्वास सुरवदे, रामेश्वर बुदडकर यांच्यासह स्थानिक नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच, सहयोगनगर- तळवडे येथे शिवशक्ती मित्र मंडळाच्या पुढाकाराने गणेश मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, पांडाभाऊ भालेकर, रमेश भालेकर, शांताराम दगडू भालेकर, शिरीष उत्तेकर, प्रतिष्ठानचे विलास पवार, बालाजी राठोड, दत्तात्रय माने, किरण कुंभार, शंकर जगताप, मोहम्मद सय्यद, योगेश गव्हाणे, रजनीकांत राठोड, नितीन चव्हाण, नंदकुमार बोत्रे, श्रीकांत धायगुडे, दादा गोरड आदी उपस्थित होते.
Discussion about this post