व्हीएसआरएस न्युज चिखली-
राष्ट्रीय महिला कबड्डीपटूला यश साने यांच्याकडून आर्थिकमदत करण्यात आले.
राधा मोरे या 2019 मधील 45 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेत कनिष्ठ गटातील मुलींच्या संघातून खेळत होत्या. कोलकाता येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे 19 जुलै 2019 रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी 1 लाख 35 हजार रुपये इतका खर्च आला.
भोसरी येथील गरीब कुटुंबातील राधा मोरे यांचे पितृछत्र हरपले आहे. तर आई कंत्राटी तत्वावर हाऊस किपिंगचे काम करते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी नातेवाईक आणि परिचयाच्या व्यक्तींकडून वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या खर्चाची तजवीज केली. उसने घेतलेलया 1 लाख 35 हजार रुपयांपैकी आतापर्यंत त्यांनी 85 हजार रुपयांची देणी परत केली आहेत. अजूनही त्यांच्यावर 50 हजार रुपयांचे कर्ज आहे.
कबड्डीत शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या गुणी कबड्डीपटूची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. त्यामुळे या खेळाडूला मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून तिच्यावरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.