व्हीएसआरएस न्युज –आकुर्डी येथील टोणगांवकर हास्पिटलमध्ये आज डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. यावेळी टोणगावकर हास्पिटलचे संचालक डॉ. अनिरुद्ध टोणगांवकर सौ. दिपाली टोणगांवकर, उपस्थित होते. त्यावेळी डॉ.विजय तळेकर, डॉ. शिवम, डॉ निकीता शेटिया तसेच हास्पिटल स्टाफ उपस्थित होते.
भारतात, इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ साजरा केला जातो. ही तारीख डॉ. विधानचंद्र यांची जयंती म्हणून निवडण्यात आली. भारतात, आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी डॉ. विधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ १ जुलै १९९१ रोजी प्रथम राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. त्यांनी लोकांसाठी आपले जीवन योगदान दिले, अनेक लोकांवर उपचार केले आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली. याशिवाय ते महात्मा गांधींचे वैयक्तिक चिकित्सकही होते.
सन १९७६ मध्ये, वैद्यकीय, विज्ञान, सार्वजनिक घडामोडी, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीला ओळखण्यासाठी बीसी रॉय राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
Discussion about this post