व्हीएसआरएस न्युज पिंपरी –५ वी ते १० वी चे
विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात येत असून पासेससाठी दि.१५/०६/२०२४ पासून सदर अर्जाचे वाटप निगडी, भोसरी, पिंपरी (नेहरूनगर) आगार व पिंपरी मुख्यालय क्र. २ (लोखंडे भवन) व सर्व पास केंद्रांवर केले जाणार आहे. अर्ज महामंडळाच्या वरील नमूद आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील.
संबंधित शाळा अथवा त्यांचेप्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकरीताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारामधून एकत्रित रित्या घेवून जाऊशकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील.ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही.
याकरीता जे विद्यार्थी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत निवास करीत आहेत व हद्दीतील शाळेत शिक्षण घेत
आहेत अशाच इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बस पास सुविधेचा लाभ घेता येईल.
तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल. ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदा चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल.
तसेच सदर पासेस करीताचे अर्ज वितरण
दि. १५/०६/२०२४ पासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरु झालेली आहे.
प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या निगडी, भोसरी, पिंपरी (नेहरूनगर) आगार व पिंपरी मुख्यालय क्र. २ (लोखंडे भवन) येथे उपलब्ध आहे. तरी पिंपरी-चिंचवड मनपाचे शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४
Discussion about this post